तर्कनिष्ठ आणि अभ्यासू
कुठलीही गोष्ट 'परंपरेने चालत आली आहे' म्हणून न स्वीकारता, स्वतःच्या तार्किक कसोटीवर आणि वस्तुस्थितीवर तपासून पाहण्याची त्यांची पद्धत होती.
दादाकाका
एक तर्कनिष्ठ आणि मूळ विचारवंत!
दादाकाका हे निव्वळ रूढी-परंपरांना शरण जाणारे नव्हते; ते प्रत्येक गोष्टीचा स्वतःच्या बुद्धीने, तर्काने आणि अभ्यासाने विचार करणारे एक मूळ विचारवंत (Original Thinker) होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, दांभिकतेवर कोरडे ओढण्याची वृत्ती आणि तितकाच टोकदार, हजरजबाबी विनोद यामुळे त्यांची प्रत्येक भेट आणि चर्चा संस्मरणीय ठरत असे.
काका म्हणजे एकदम ओरिजनल विचारवंत! सर्व विचार ओरिजनल आणि पुरोगामी. आणि नुसते विचार नाही — सर्व विचार डायरेक्ट अंमलात आणणार! — मकरंद
दादामामाची मतं, तत्त्व, आचरण अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेतलेलं, सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणारी होती... पुन्हा पुन्हा विचार केला की प्रथम न पटणारी मतंच योग्य आहेत हे उमगून यायचे. — सौरभ
कुठलीही गोष्ट 'परंपरेने चालत आली आहे' म्हणून न स्वीकारता, स्वतःच्या तार्किक कसोटीवर आणि वस्तुस्थितीवर तपासून पाहण्याची त्यांची पद्धत होती.
कोणत्याही एका बाजूचा पक्षपाती विरोध त्यांना मान्य नव्हता. सार्वजनिक उपद्रव किंवा धार्मिक अतिरेक कोणत्याही धर्माचा असो, त्यावर ते समान निडरतेने बोट ठेवत.
त्यांच्याकडे एका वाक्यात समोरच्याला निरुत्तर करण्याचे आणि सभोवतालच्या विसंगतींवर मिश्कील पण भेदक भाष्य करण्याचे विलक्षण कसब होते.
सांगणारे: आदित्य व आनंद — दादाकाकांचे मुलगे ("बाबा") · सौरभ — दादाकाकांच्या बहिणीचा मुलगा ("दादामामा") · मकरंद — पुतण्या ("काका"). भाऊ म्हणजे दादाकाकांचे वडील. (स्रोत: "पटवर्धन कट्टा" व्हॉट्सॲप ग्रुप, सप्टेंबर २०२६)
शाळा ६ वीत असताना सोडावी लागली. ६ वी पर्यंत दादर — छबिलदास.
पण तेव्हाचे गुरुजी त्यांना पुन्हा ६ वीत बसावं लागेल म्हणाले... बाबा बोलले... नाय बसणार... बिचारी आजी.. "६ वी तर ६ वी.. बस, काय फरक पडतो" असं समजवून थकली...
त्या गुरुजींना काळजी होती की हा नापास झाला तर त्यांची grant कमी होईल.. पगार कमी.... पण पोवार नावाच्या एका गृहस्थाने गुरुजींना सांगितलं की विनूला ७ वीची परीक्षा देऊ द्या... नापास झाला तर तुमचं होणारं नुकसान मी भरून देईन.
तेव्हा गुरुजींनी form भरला... आणि.... बाबा तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यात पहिले आले... गुरुजी महाडवरून result घेऊन उडत उडत आले.... त्यांच्या आयुष्यातलं न भूतो न भविष्यति यश.
त्या पोवारांचा मुलगा तुकाराम पोवार बाबांचा शेवटपर्यंत मित्र राहिला. तुकाराम पोवार लवकर वारले. बाबा बिरवाडीत राहायला गेले तेव्हा तुका वैकुंठाला already गेलेला होता. (बाबा त्यांना "तुका" असंच बोलवत.)
६ वी नंतर attend केलेला एकमेव course म्हणजे शेतकीचा certificate course (२ वर्षांचा). प्रचंड काम करून घेत असत कॉलेजवाले (कोसबाड शेतकी संस्था).. निम्मी मुलं पळून गेली..
पण बाबा पळून जाणार कुठे? बिरवाडीत? तिथे तर खायला घरात काही नाही.. दारिद्र्य... म्हणून, रग्गड काम आणि त्याबदल्यात दोन वेळा जेवण आणि मग certificate. तिथेही बाबा २ रे आले होते.
शाळा ६ वीत असताना सोडावी लागली. पण डिग्र्या ३ — BA, B.Ed, B.Com. (आदित्य)
External candidate म्हणून — बीए आणि बीएड पुणे विद्यापीठ (attended lectures), बीकॉम शिवाजी विद्यापीठ. मुंबई विद्यापीठात त्यांनी बीए प्रारंभ केला परंतु सोडून द्यावे लागले. (आनंद)
मुंबई युनिव्हर्सिटीकडे तेव्हा correspondence degree नव्हती. ती खूप उशिरा सुरू झाली. (आदित्य) — बाबा बॉम्बे युनिव्हर्सिटीचा उल्लेख "दळभद्री" असाच नेहमी करत असत. (आनंद)
मला अंधुक आठवतंय काकांनी इतरांना सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटीची external degree करण्याचा सल्ला दिल्याचं. पण प्रॉब्लेम असा असायचा, बहुतेक लोकांना काकांचे सल्ले समजण्याची कुवत नसायची. काहीतरी वेगळं करणं जमायचं नाही. त्या काळात या गोष्टी शोधणं आणि शिकणं! कमाल आहे! (मकरंद)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षकांची कमतरता होती. त्यावेळी बाबांनी भाऊंना (आजोबा) ही एकशिक्षकी शाळेच्या शिक्षकाची नोकरी सुचवली. असे मला स्वतः ती. भाऊंनी सांगितले. (आनंद)
आणि height म्हणजे, एकदा call आला तर भाऊ, नोकरीवर रुजू होण्याऐवजी पोलादपूरला नेहरूंच्या सभेला गेले होते. का तर म्हणे तो राजा आहे... तो आला की जायलाच पाहिजे.
नेहरू राजा आहे, पण तुम्ही काय दरबारातले मानकरी आहात का? की सलामीसाठी गेलंच पाहिजे?
अशी बाबांनी सॉलिड खरडपट्टी काढली. पण ६ महिन्यांनी वरून जिल्हा परिषदेची पुन्हा तार आली. तेव्हा मात्र भाऊ गेले आणि नोकरीवर रुजू झाले... (आदित्य)
बाबांनी इंग्लिश वाक्यरचनेसाठी एक table बनवलं होतं... Really the skeleton... खूप सोपं करून. आणि त्या टेबलवर त्यांनी त्यांच्या म्युनिसिपाल्टीच्या शाळेतल्या मुलांचं इंग्लिश ग्रामर घडवलं.. Results फार छान असायचा इंग्रजीचा...
पण आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज भरायला त्यांचा तात्त्विक विरोध राहिला... (आदित्य)
मी शिकवण्याचा पगार घेतो... मग मी शिकवलं तर त्यात काय आदर्श... मी काम केलं.
माझं इंग्लिश आजही त्यामुळे उत्तम आहे. (आनंद)
माझ्या बाबांचा हळदीकुंकू सणाला कायम विरोध होता. हा सण फक्त पुरुषी वर्चस्व दर्शवणारा आहे. नवरा जिवंत असणे हेच qualification आहे या सणासाठी, जे आजच्या काळाशी पूर्ण विसंगत आहे.
शाळेत बाबा ज्या वर्गाचे classteacher असतील त्या वर्गात "हळदीकुंकू" ऐवजी "तिळगुळ समारंभ" करायला सांगत, आणि सर्वच पुरुष, महिला (सौ. आणि श्रीमती दोन्ही) शिक्षकांना बोलवायला सांगत. English सोबत समाजप्रबोधन करण्याचा असा माफक प्रयत्न आवर्जून करत.
त्याउप्पर, त्यांचं तर असंही म्हणणं होतं की वयाने कमी असल्याने बायकोच जास्त जगणार. तिला स्वयंपाक येतो, मुलांना ती सांभाळू शकते, त्यामुळे तिचं मुलाच्या/पुढल्या पिढीच्या संसारात निभावतं. किंबहुना महत्त्वही टिकून राहतं. नवरा मात्र स्वयंपाक, लहान मुले सांभाळणे etc. साठी निरुपयोगी असतो 😂. सुनेला दहादा चहा टाकायला सांगून त्रासच देतो.
त्यामुळे बायको जिवंत असल्याचं celebration म्हणून पुरुषांनीच हळदीकुंकवासारखा कार्यक्रम करून बायकोचा सत्कार करावा.
मध्यंतरी घोडनवरा बनलेला गिरीश ओक आणि विधवा निवेदिता जोशी असे कपल असलेली एक सिरीयल एका चॅनेलवर आलेली. सून बनलेल्या तेजश्री प्रधानला सासूचा पुनर्विवाह पटलेला होता पण हिरोला ते सहन होत नाही...
फार फार पूर्वी, १९९२-९३ च्या आसपास, द्वारका मावशींचं technically लग्न आपल्या आजोबांशी (म्हणजे भाऊ) लावायचा बाबांचा विचार चालला होता. Just on paper... म्हणजे आजोबा गेले तरी आजोबांचं पेन्शन द्वारका मावशीला पत्नी ह्या नात्याने तहहयात मिळत राहील... आणि तिला तिचं स्वतःचं असं income राहील. पण आजोबा २-३ महिन्यांतच गेले... आणि पेन्शनही गेलं.
जी बोल्ड सिरीयल (म्हणजे फक्त concept-wise बोल्ड) काढायला Zee TV ला २०२० पर्यंत थांबावं लागलं... ते बाबांनी १९९३ ला ठरवलं होतं... स्वतःच्या वडिलांसाठी.
आपली मुंज झाली नाही हे मला इतकं छान वाटतं! (मकरंद)
माझे तर कान ही टोचलेले नाहीत. मुलाचे कान न टोचणारा हिंदू असू शकतो. मुंज नाकारणारा हिंदू असू शकतो. (आदित्य)
इतका छान पेपर असलेलं गुळगुळीत मॅगझिन फक्त काकांकडे होतं! (मकरंद)
'Soviet Land' नावाचे नियतकालिक बाबांना कोणीतरी आणून दिले. कम्युनिझमचा प्रचार करणाऱ्या एखाद्या मित्राने ते दिले असावे असा माझा कयास आहे. पूर्वी बाबा डाव्या विचारसरणीचे होते त्यामुळे त्यांना ते मॅगझिन आवडले आणि त्यांनी थेट पाच वर्षांसाठीची वर्गणी भरून टाकली.
शिवाय त्यातील कागद चांगला असायचा आणि त्याचा पुस्तकांना कव्हर घालायला उपयोग व्हायचा ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू होती. फार महाग नव्हता असं वाटतं. (आनंद)
रद्दी कधी महाग असते का??? 😂 कम्युनिस्टांनी प्रचार आणि प्रसारावर इतका खर्च केला आणि सोव्हिएत युनियन कधी तुटला त्यांनाच नाय कळलं. (आदित्य)
मामा पुरोगामी होता पण त्याला पांडुरंग शास्त्री आठवले यांचे साहित्य वाचायला आवडत होते. त्याला हिंदूंच्या चुकीच्या रूढींबद्दल राग तिटकारा होता पण हिंदू धर्माचे लोकच जास्त पुरोगामित्व दाखवू शकतात असे त्याचे मत होते...
इतर धर्मात विशेषतः इस्लाम मध्ये ते स्वातंत्र्य नाही हे त्याचे ठाम मत होते... फाळणी आणि त्याला जबाबदार असलेल्या इस्लामबद्दल आणि तथाकथित नेत्यांचा त्याला रागच होता.
बाबांना कर्मकांड मंजूर नव्हतं... पण ते सेंट परसेंट हिंदू होते. (आदित्य)
बाबांचे एक वाक्य मला आठवते. ते नेहमी म्हणत: (आनंद)
माझे काहीतरी पूर्वपुण्य असले पाहिजे म्हणून एका चांगल्या घरात आणि हिंदू धर्मासारख्या उदारमतवादी धर्मात माझा जन्म झाला. अन्यथा मी सुद्धा धर्मांध झालो असतो.
"पुलं — एक साठवण" मी काकांकडे वाचलं.
दादाकाकांविषयीचे तुमचे अनुभव, किस्से, त्यांनी मांडलेले विचार किंवा जुनी छायाचित्रे या पानावर जोडण्यासाठी आम्हाला नक्की ईमेल करा.